११ नोव्हेंबर २०२१ पासून नियमित शाळा सुरु ?
राज्यात गेल्या दीड वर्षापासून १ ते ४ शाळा कोरोनामुळे बंद होत्या ऑनलाईन शिक्षण सुरु होते परंतू बऱ्याच पालकांना, शिक्षकांना शाळा सुरु व्हाव्यात असे वाटत होते त्यामूळे तिथे पट संख्या कमी आहे त्याही ठिकाणी शाळा सुरु होण्याबाबत पालकांचा सुर होता. शिक्षक दररोज शाळेत जावून ही शाळा भरवू शकत नव्हते त्यामूळे आजच्या अहमदनगर जि.पच्या पत्रानुसार राज्यात पुन्हा चिमुकल्यांचा आवाज येऊ शकतो ही सर्वांसाठी आनंदाची बाबा आहे. दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ पासून नियमित शाळा सुरु करणे बाबत. संदर्भ :- १. शिक्षण समिती मासिक बैठक दिनांक २२.१०.२०२१
२. मा.मुकाअ यांनी दिनांक २५.१०.२०२१ रोजी VC मध्ये दिलेल्या सूचना. नुसार शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.
उपरोक्त संदर्भ एक नुसार शिक्षण समितीने दिलेल्या सुचनांनुसार व याच अनुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळा दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी विदयार्थ्यांसह नियमीत शाळा सुरु करण्याबाबत सविस्तर सूचना देवून ठराव संम्मत करण्यात आला आहे. तसेच संदर्भ क्रमांक २ च्या अनुषंगाने खालील सूचना दिल्या आहेत.

शाळा सुरु करण्यासंबधी सुचना-
१. दिवाळीपूर्वी शाळेचे वर्ग, शाळेचा आवार परिसर इत्यादी शालेय स्वच्छता ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून लोकसहभागाच्या माध्यमातून चळवळीच्या स्वरुपात पूर्ण करुन घेणे.
२. त्यासाठी शाळा सुरु करण्यापूर्वी गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,
मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घ्यावी.
३. शाळा सुरु करणेबाबत गावाची सक्रीय भुमिका महत्वाची आहे. याबाबत सर्व संबंधितांना अवगत करावे. शाळा व्यवस्थापन समिती बैठका, वर्ग पालक समांचे आयोजन शिक्षकांचे प्रबोधन करावे. पालकांमध्ये स्वतः पुढाकार घेवून निहाय
जाणीव-जागृती करुन विदयार्थी उपस्थिती वाढेल, टिकवून राहील. यासाठी प्रयत्न करावेत.
४. • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचा लसीकरणाबाबत दक्षता घेण्यात यावी. त्यात प्रामुख्याने एकही डोस न घेतलेले कर्मचारी यांचे लसीकरण दिवाळी सुटीपूर्वी होईल यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्र स्तर, तालुकास्तर येथे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचेसमवेत संमपर्क साधून एक विशेष कॅम्प आयोजित करावा. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व तालुका स्तरावर एकही डोस न झालेल्या कर्मचा-यांची शाळा निहाय नावानीशी यादी तयार करून जतन कराव्यात यामध्ये अदयापपर्यन्त डोस न घेण्याचे कारण देखील नमूद करावे. ज्यांचा एक पूर्ण झाला आहे, त्यांना दुसरा डोस घेणे बाबत सूचीत करावे.
५. प्रत्येक शाळेमध्ये नळाच्या पाण्याचा पुरवठा होतो का ? नळाला पुरेसे पाणी येते का, याची पडताळणी करुन आवश्यक उपाय योजना तातडीने कराव्यात. वरील सर्व मुदयांचा पूर्तता अहवाल दिवाळीची सुटी लागण्यापूर्वी या कार्यालयास विनाविलंब सादर करावा
वरील प्रमाणे सुचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे राज्यात सुध्दा सर्व जि.प अशा प्रकारचा ठराव घेऊन शाळे सुरु करण्यासंदर्भात सुचना देवू शकतात त्यामुळे वरील सुचना हया सर्वच मुख्याध्यापक आणि शिक्षक,केंद्रप्रमुख यांच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यानुसार तयारीला लागावे.