झाडाचे नांव-3 वटवृक्ष- शास्त्रीय नांव- Ficus benghalensis, फायकस बेंगालेन्सिस
वैशिष्टये- भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला ओळखले जाते. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात.फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो .पिढयानपिढया वाढवणाऱ्या आणि अन्नाचा पुरवठा करणारे सोबती सखा पारंब्या हे या झाडाचे मुख्य वैशिष्टये आहे.प्रचंड मोठे आणि विस्ताराने आकाराने मोठे असलेले वृक्ष आहे.
हवामान- भारतीय हवामानात हे वृक्ष नेहमी येते.
ठिकाण-सहयाद्रीच्या रांगा,पश्चिम बंगाल,केरळ,उडीसा,गोवा,गुजरात

महत्व/उपयोग – सर्वात जास्त ऑक्सीजन निर्मिती करणारा वृक्ष आहे. तसेच हा वृक्ष कार्बनडायऑक्साईड शोषूण घेतो. आयुर्वेदात वटवृक्ष हा अनेक रोग बरा करणारा अभयी औषधी वृक्ष आहे.वडाचे सर्व भाग हे औषधे म्हणून वापरले जाते. जखम भरून काढणे,दंतवेदनानाशक,पारंब्याचे अनेक उपयोग आहेत. वेद आणि अनेक ग्रंथात या वृक्षाचा उल्लेख आढळतो. वटपोर्णिमेला या वृक्षाची पूजा करतात.ब्रम्हदेव व शिवशंकर यांचे निवास स्थान हे वृक्ष मानतात अनेक पुराणात यांच्या कथा सांगतात.Tree is My Smart Friend.
लेखक व संकलक
विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
जि प शिक्षक