bel tree

Bel Tree-  Aegle marmelos, एगल मार्मेलोस

झाडाचे नांव - ५ बेल

शास्त्रीय नांव- Aegle marmelos, एगल मार्मेलोस

वैशिष्टये-  खरं तर ऑक्सिजन झाडांची यादी बेलच्या झाडांपासून सुरू होते. हे झाड औषधी वनस्पतींचा समृद्ध स्त्रोत आहे. या झाडाची पाने, मुळे, फळे, फुलांमध्ये औषधी गुण आहेत. या वनस्पतीचे मूळ भारतातील असून ते बंगालचे फळ, सोनेरी सफरचंद इत्यादी नावाने ओळखले जाते. हे प्राणवायूचे झाड जमिनीपासून 40-50 फूट उंचीवर वाढते आणि सुमारे 30-60 वर्षे जगते. या झाडाला काटे असतात, संत्रा सारखे दिसणारे फळे येतात ती हिरवे आणि पिवळसर होतात.पाने,फळे,झाडाचे खोड हे सर्वच गुणकारी आहे.

हवामान– भारतीय हवामानात हे झाड येते/उगवते
ठिकाण– भारत दक्षिण अशिया या भागात आढळते.

महत्व– ते वातावरणातील विषारी आणि सर्व रासायनिक प्रदूषके शोषून घेते आणि आजूबाजूच्या वातावरणाला तटस्थ करते. हा ऑक्सिजन वृक्ष हवा शुद्ध करतो आणि सूर्यप्रकाशाच्या उनात ऑक्सिजनचा जास्त उसर्जन करतो. हवा शुध्द करणारे हे झाड आहे. त्याचे शास्त्रीय नाव ‘एगिल ‘या इजिप्त्शियन या देवतेवरून ठेवले गेले.हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. झाडाच्या खोडावर खालपासून वरपर्यंत तीक्ष्ण काटे असतात. पुराणात ही या झाडाचा उल्लेख शिवशंकर या देवतासोबत जोडला जातो तयामुळे या झाडाला भारतात विशेष ओळख आहे.

या वरुन एक म्हण आहे “बेलाला पाने तीनच…….”.

bel tree

उपयोग–   बेलच्या झाडामध्ये पोषक, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि बरेच आरोग्यदायी गुण असतात बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने व खोडाचा गाभा याचाही औषधी उपयोग होतो .बेलफळाचा मुरंबा,सरबत ,हे अवेवारचे रुचकर औषध ,भूक वाढणारे टॉनिक या झाडाच्या फळापासून मुरांबा तयार करतात उष्णताहारक,क्षय,हदयविकार,पोट दुखणे,शर्करा कमी करणारा,अशी या झाडाची ओळख आहे.

बेलात निक असिड, उडनशील तेल, टनीन तसेच मारशेलीनीस हे महत्वाचे घटक आहेत.आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वात ज्वर, कमजोरी, अग्निदग्ध, व्रण गलगंड, तृषाविकार, रक्तातीसार, पित्त अतिसार  अशा सर्व आजारावर हे महत्वाचे फळ मानतात.

हे झाड शंकराच्या पिंडीवर वाहिले जाते त्यामुळे हे बेल पूजनासाठी वापरतात पूर्वी बेलपत्र म्हणून याचा वापर केला जात असे.श्रावण महिन्यात या पानाचा वापर जास्त करतात.

झाड वाचली पाहिजेत झाडे वाचली तरच आपण वाचू !!!

Tree is My Smart Friend

लेखक व संकलक-
विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
जि प शिक्षक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top