हे महत्वाचे सरकारी ॲप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असलेच पाहिजेत!
आज जग आपल्या बोटावर आहे परंतु आपण त्या बोटांना योग्य दिशा देत नाही. आणि कोणते सरकारी काम निघाले की आपणास बऱ्याच वेळा एखादा कागद मिळवण्यासाठी आपणास हेलपाटे मारावे लागतात आणि एजंटला ही सांभाळावे लागते. त्यासाठी काही महत्वाचे ॲपची आपण माहिती घेणार आहोत.
१. SWachh Bhrat App-Track and Contribute to Swachh Bhrat Mission
हे ॲप काय करते वाचा… आपल्या परिसरात किंवा नगरपालिका,महानगरपालिकाकिंवा आपण जेथे राहतो तेथे तर कचऱ्याचा ढिगारा आपणास दिसत असेल तर आपण यांचा फोटो काढून या ॲप मध्ये फोटो काढून हे अपलोड करावा लागेल. केंद्रीय शहरी विकास (UD) मंत्रालयाने संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अँड्रॉइड आणि iOS वर सुरू केलेले हे मोबाइल अॅप. नागरी समस्या सोडवण्यासाठी तयार केले आहे.दिसला कचराकी काढा फोटो!
आपण या ॲप वर कचऱ्यासंबधी तक्रार नोंदवू शकता. सदरील तक्रार किंवा फोटो हे संबधित महापालिका किंवा प्राधिकरणाकडे पाठवले जाते. सर्व शहरे आणि स्थानिक संस्था या ॲप शी कनेक्ट केल्या आहेत.त्यामुळे फोटो चे लोकेशन वरुन ही बाब तात्काळ संबधित पालिकेला पाठवली जाते. यात नागरीक आपले मत ही मांडू शकतात. त्यानंतर आपल्या तक्रारीचे निवारण झाल्यावरही आपणाकडून अभिप्राय मागवले जातात.

२.UMANG- डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून भारत सरकारने UMANG हे ॲप सुरु केले आहे.हे ॲप आताच्याकाळात शासनाकडून युनिफाईड मोबाईल ॲप हे मास्टर ॲप म्हणून डिजाईन केले आहे. हे हे केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाद्वारे ऑफर केलेल्या 200+ सेवा जसे की पासपोर्ट सेवा, जमीन नोंदी, प्राप्तिकर, ई-पोस्ट, युटिलिटी बिले आणि बरेच काही एकाच छताखाली एकत्रित दिसते. या प्लॅटफॉर्मची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ते नागरिकांचे वैयक्तिक तपशील, त्यांची प्राधान्ये आणि विभागीय सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक डेटा प्रत्येक वेळी पुन्हा प्रविष्ट न करता लक्षात ठेवतील. हे वापरकर्त्यांना आधार-आधारित प्रमाणीकरण आणि बहुभाषिक समर्थन देखील प्रदान करेल. आणि कोणत्याही भाषेतील आपल्या महत्वाच्या योजना यांची माहिती ते देतील किंवा या ॲप च्या माध्यमातून अनेक गोष्टी घरीबसून आपणास मिळवता येतील. डाऊनलोड कोठे कराल? -Google Play Store

- MyGov – Access Government Initiatives मेरी सरकार
ॲप हे प्रशासनात थेट नागरीकांची मार्गदर्शन घेण्ध्ण्यासाठी तयार केले आहे. या मध्ये भारतातील प्रत्येक नागरीक आपल्या कल्पना,सुचना किंवा एखादी महत्वाची माहिती शासनापर्यत पाठवू शकता. आणि आपल ही मोलाचा सहभाग नोंदवू शकता. या ॲपचा उददेश्र आहे की प्रत्येक नागरीकांना थेट कोणत्याही कार्यक्रमात भाग घेता येतो.
या वैशिष्ट्यपूर्ण अॅपवर लॉगिन आयडी तयार केल्यानंतर, नागरिक स्वच्छ भारत, ओपन गव्हर्नमेंट डेटा प्लॅटफॉर्म, माय गव्हर्नमेंट टास्क मॅनेजमेंट आणि माय गव्ह न्यूजलेटरसह अनेक सरकारी उपक्रम साइट्सवर सहज प्रवेश करू शकतात. MyGov अॅपच्या कक्षेत, देशातील विविध कानाकोपऱ्यातील नागरिकांना MyGov टाऊनहॉलद्वारे पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळते, हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे.
