| पंढरपुरात शिवगौरव पुरस्काराचे वितरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पंढरपूरात राणा प्रताप ग्रुप च्या वतीने आदर्श माता,क्रिडा,शिक्षण,समाजसेवक,साहित्या,आरोग्य व आदर्शसंस्था असे प्रत्येकी एका व्यक्तीला शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये मला शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबददल शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वितरण समारंभ शुभहस्ते * मा. श्री उमेशराव परिचारक (चेअरमन, युटोपियन शुगर्स, कचरेवाडी ता. मंगळवेढा) झाले. कार्यक्रमाचे * अध्यक्ष *मा. श्री. बालाजी पुदलवाड (व्यवस्थापक, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर), व * प्रमुख उपस्थिती मा. डॉ. सचिन वाळुजकर साहेब (वैद्यकिय अधिकारी, उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर) मा. श्री. विश्वंभर पाटील ( प्रसिद्ध कर सलागार, पंढरपूर) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खालील पुरस्कार प्राप्त व्यक्तीना * शिवगौरव पुरस्कारपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रीडा श्री. अशोक माने सर आदर्श माता सौ. मिनाक्षी भोसले, शिक्षण श्री. ज्ञानेश्वर विजागत साहित्य श्री. सूर्याजी भोसले आदर्श संस्था निसर्ग संवर्धन संस्था, पंढरपूर समाजसेवक श्री. माऊली म्हेत्रेआरोग्य श्री. अंकुश क्षिरसागर – * विशेष सत्कार * कु. आस्थ अजित माने व चि. शिवम शाम गोगाव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मा परिचारक साहेब यांनी पंढरपूर मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात हे आणि व्हावेत यासाठी राणाप्रताप ग्रुप मधील सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्वच छेत्रातील मान्यवरांचा सत्त्कार करणे व प्रेरणा देणे हे फार मोठे कार्य राणा प्रताप ग्रुप करत आहे तयाबददल ग्रुपचे मान्यवरांनी कौतुक केले आहे. शिवगौरव पुरस्काराचे वैशिष्टये म्हणजे कोणता अर्ज न घेता दिलेला पुरस्कार होय. प्रत्येक क्षेत्रातील फक्त १व्यतीची निवड, मान्यवर व प्रमुख पाहूणे यांची योग्य निवड होती. दोन दिवस अगोदरच पुरस्काराचे निवड जाहीर करण्यात आली होती. या ग्रुमपचे अध्यक्ष मा श्री. राणा प्रतासिंह चव्हाण सर व त्यांचे टिमचे कौतुक करावे तेवढे कमीच कारण वेळेवर आणि शिस्तबध्द कामाची व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.सदरील ग्रुप प्रोत्साहन देणे व प्रेरणा देणे या सारखे समाजिक शैक्षणिक काम करणारी नावाजलेली संस्था आहे. यावेळी सर्वच मान्यवरांनी आपल्या अनमोल विचारांची गुंफन केली. यावेळी महेश भोसली,ज्ञानेश्वर मोरे सर, देविदास जगतापसर,अशोक क्षिरसागर सर,प्रशांत वाघमारे सर, डॉ.सचिन लादे सर,डॉ. केसकर मॅडम,विजय राऊत,बाबासाहेब घोडके,रोहित दिवटे,घाडगे सर, चव्हाण सर चळे, व इतर मान्यवर उपसिथत होते.
|
