CTET EXAM ची रचना आणि स्वरुप कसे असते?
(१) पेपर I – अशा व्यक्तीसाठी असेल ज्याला इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेले विदयार्थ्यी.
(२) पेपर II- हा इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेले विदयार्थ्यी/
व्यक्तीसाठी असेल.
टीप: दोन्ही स्तरांसाठी पात्रता असेल आहे ती व्यकती दोन्ह पेपरसाठी अर्ज करु शकतात
१)(इयत्ता-: पेपर I (इयत्ता 1 ते वी साठी) प्राथमिक टप्पा. अभ्यासक्रमातील घटक व प्रश्ननिहाय
१) बाल विकास आणि अध्यापनशास्त्र- ३० प्रश्न- ३० गुण
२) भाषा-१ अनिवार्य ३० प्रश्न- ३० गुण
३) भाषा-२ अनिवार्य ३० प्रश्न- ३० गुण
४) गणित ३० प्रश्न- ३० गुण
५) समाजशास्त्र ३० प्रश्न- ३० गुण
एकुण गुण १५० प्रश्न- १५० गुण
प्रश्नांचे स्वरूप आणि मानक:
बाल विकास आणि अध्यापनशास्त्रावरील काी महत्वाचे प्रश्न 6-11 वर्षे वयोगटाशी संबंधित शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या शैक्षणिक मानसशास्त्रावर लक्ष केंद्रित करतील. ते वैविध्यपूर्ण शिकणार्यांची वैशिष्ट्ये आणि गरजा, शिकणार्यांशी संवाद आणि शिकण्याच्या चांगल्या सुविधा देणार्याचे गुणधर्म आणि गुण समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करतील.अशाप्रकारचे प्रश्न असतील
भाषा I हा भाग शिक्षणाच्या माध्यमाशी संबंधित कौशाल्यावर आधारित प्रश्न असतील.
भाषा II मधील चाचणी आयटम भाषा, संवाद आणि आकलन क्षमता या घटकांवर लक्ष केंद्रित करेल.
भाषा II ही भाषा I व्यतिरिक्त दुसरी भाषा असेल. उमेदवार उपलब्ध भाषा पर्यायांमधून भाषा I आणि दुसरी भाषा II म्हणून कोणतीही एक भाषा निवडू शकतो आणि पुष्टीकरण पृष्ठावर ती निर्दिष्ट करणे आवश्यक असेल.
भाषा -१ व भाषा 2 हे एकच भाषा निवडता येणार नाही.
वरील सर्व अभ्याक्रम हा १ ली ते ५ वीच्या NCERT च्या अभ्याक्रमावर आधारित असणार आहे
त्यामुळे आपणास सर्व पुस्तके हे हिंदी किंवा इंग्रजीतच वाचावे लागतील. आणि तेही NCERT च्या अभ्याक्रमाचेच..कारण आपणास यातील महत्वाचे प्रश्न परीक्षेला आलेले आहेतच.
CTET - पेपर २
2) पेपर II (इयत्ता सहावी ते आठवीसाठी) प्राथमिक टप्पा :
परीक्षेचा कालावधी – अडीच तास असणार आहेत
खालील त्याप्रमाणे अभ्याक्रम असणार आहे. रचना आणि स्वरुप पाहा.वाचा.
१) बाल विकास आणि अध्यापनशास्त्र (अनिवार्य) – ३० प्रश्न- ३० गुण
२) भाषा-१ अनिवार्य ३० प्रश्न- ३० गुण
३) भाषा-२ अनिवार्य ३० प्रश्न- ३० गुण
खालील पैकी एका विषयाची निवड करणे गरजेचे आहे.
४) (गणित आणि विज्ञान शिक्षकांसाठी) ६० प्रश्न- ६० गुण
किंवा
४) सामाजिक अभ्यास/सामाजिक विज्ञान ६० प्रश्न- ६० गुण
एकुण गुण १५० प्रश्न- १५० गुण
पेपरचे माध्यम- हे हिंदी व इंग्रजी भाषेतच असेल यांची नोंद घ्यावी तसेच यावर्षीपासून परीक्षा ऑनलाईन होत आहे सध्या डेमोला तर भाषा निवडता येते पण मध्ये परीक्षा चालू असताना भाषा बदलता येत नाही.
काही प्रश्न हिंदीतून जर समजले नाहीत तर आपण इंग्रजीतून वाचून सोडवावेत.