परीक्षेला जाता जाता………………..
परीक्षेला जाता जाता काही नियम पाळावेच लागतात.
सर्व परीक्षा धारकांना उदया होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा!
गेल्या ३ महिन्यापासून TET परीक्षेवर प्रश्न सोडवत आला आहात…..
प्रश्न सोडवताना काही टिप्स मी आपणास सांगणार आहे.
१. प्रश्न सोडवताना काट पध्दतीचा वापर करा.
म्हणजे ४ पर्यायाची संपूर्ण माहिती नसेल तरच या पध्दतीचा वापर करा.
२. संपूर्ण पर्याय माहित असतील तर स्मरण करा आणि योग्य पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा.
३. सर्व प्रथम तुम्हाला जो भाग कमी वेळेत सोडवता येतो तो च प्रथम सोडवावा.
४. शेवटी अवघड व सर्व कमी वेळ लागणारे सोपे प्रश्न सोडवूनच अवघड प्रश्न सोडवा.
५. सर्व प्रश्न नक्की वाचा काही वेळेस वेळ पुरला नाही तर ज्या प्रश्नांचे उत्त्तर येते तो प्रश्न सोडवायचा राहून जातो. वाचाल तर वाचाल..
६. इंग्रजीचे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा.
७. सर्व प्रश्न हे आपल्या पाठयक्रमावरच आधारित आहेत. त्यामुळे आपणास उत्तर माहित असून ही काही चुका टाळा.
८. आपण जे उत्त्तर निवडतो तेच उत्तर बरोबर उत्तरपत्रिकेत निवडले का ते पाहा मगच पर्याय काळा करा. त्याच पर्यायाला काळजीपूर्वक निवडा.
९. कधी कधी प्रश्न सोपा असतो म्हणून खुप आनंद होतो आणि जे उत्तर निवडायचे सोडून तिसराच पर्यायाला गोल केले जाते यातच तुमचे मार्क जातात..प्रत्येक मार्क तुमचे भविष्य ठरवितो.
१०. उत्तर पत्रिका फाटणार नाही किंवा घाम येतोय म्हणून खराब होणार नाही याची काळजी घ्या.
११. पेपर सोडवताना आत्मविश्वास कमी होवू देवू नका.
१२.गणिते सोडवताना हातचा किंवा अंक गडबडीत चुकीचा लिहल्यामुळे उत्तर येत असताना चुक होते त्यासाठी कोणतीही घाई न करता प्रश्न अचुक कसा सोडवता येईल यावर लक्ष दया.
१३. एकादा प्रश्न सोपा आहे म्हणून पर्याय न पाहताच उत्तर मनाने निवडू नका. पर्याय पडताळून पाहा.
१४. प्रत्येक प्रश्नांचा योग्य अर्थ व समजून घ्या. प्रश्न मोठा असेल तर प्रत्येक वाकय पडताळून आणि जाणून घ्या.
१५. एखादा प्रश्न कठिण वाटत असेल तर लगेच दुसरा प्रश्न घ्या आणि लगेच कच्चे आरेखन च्या ठिकाणी प्रश्न क्रमांक लिहून ठेवा म्हणजे शेवटी लगेच सापडेल.
१६. विधानावर प्रश्न असतील तर ते क्रमाने मांडणी करुनच त्यांची उकल व अर्थ समजून घ्या.
१७. काही प्रश्नामध्ये आकृत्या असतात त्या आकृत्याचे योग्य निरीक्षण करा आणि कुशलतेने सोडवण्यापूर्वी समजून घेऊनच सोडवा.
१८.उत्तर पत्रिकेवर कोणतेही खाडाखोड किंवा लिहू नका.
१९ तुम्ही आजपर्यत भरपूर अभ्यास तर केलाच आहे. चल तर मग तणावमुक्त राहून उत्तरे लिहूया….
सर्वांना शुभेच्छा….. https://esmartguruji.com/