झाडाचे नांव-२ पिंपळ
शास्त्रीय नांव- Ficus religiosa
वैशिष्टये- पिंपळ हा फार महत्वाचा वृक्ष आहे. हा वृक्ष आपण पडक्या घरावर,विहिरीच्या कटडयावर मोडकळीस आलेल्या जुनाट ठिकाणी हा वृक्ष येतो. हा वृक्ष खुप दिवस जगतो म्हणून हा अक्षय वृक्ष म्हणून ओळखला जातो.
गौतम बुध्दांना ज्ञानप्राप्ती ज्या वृक्षाखाली झाली तो वृक्ष म्हणजे पिंपळ होय म्हणून याला बोधिवृक्ष म्हणजे ज्ञानाचा वृक्ष असे ही म्हणतात. हे झाड साधारण ११ ते १५ मीटर पर्यंत वाढते या झाडाचे बुंदा मोठा आणि गुळगुळीत असतो. पाने हिरवी आणि पिवळसर असतात.याला लाल प्रकारचे लहान फळे येतात. ही फळे पक्षांना खुप आवडतात. त्यामुळे पक्ष्याच्या विष्ठेमार्फंत यांचे दुरवर पसरतात आणि सहज उगवतात. हा वृक्ष ऑक्सीजन जास्त सोडतो आणि हवा शुदध करण्यास मदत करतो.
हवामान– सर्वसाधारण सर्व ठिकाणी आढळणारा वृक्ष आहे.उबदार समशीतोष्ण हवामान, कोणत्याही हवामानात येणारे झाड
ठिकाण- हिमालय,पंजाब महाराष्ट्र,ओरिसा,पं बंगाल,बिहार, चीन,नेपाळ,अंदमान निकोबार,थायलंड,इराण या ठिकाणी हे जास्त प्रमाणात दिसतो.
महत्व/उपयोग – हदयासारख्या आकराची पाने असणारे झाड आहे. संपूर्ण झाड हे औषधाचे माहेर घर आहे असे मानतात कारण याचा वापर फार मोठा केला जातो. लाख बनविणे, जखमेचे डाग घालवणे,पोटाचे विकार,आणि काढा पौष्टीक आणि शक्तीवर्धक म्हणून ही वापरतात.मुत्रविकार ,पचन विकार अस्थमा,मधुमेह कब्ज,ताप सर्दी,काविळ अशा भयंकर रोगावर या झाडापासून गुणकारी औषधी पावडर बनवतात
झाडाला हिंदू धर्मात,बौध्द धर्मात विशेष महत्व आहे. पिंपळ या झाडाच्या पानाचा उल्लेख हा हडाप्पा अणि मोहोंजेदाडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत. हे या झाडाचे विशेष महत्व आपणास कळते त्यामुळे या झाडाच्या लागवड होण फार गरजेचे आहे. म्हणून आपण या झाडाची लागवड डोंगर दऱ्या,घराशेजारी,शेतीत करु शकता.
Tree is My Smart Friend.

जोतिषामध्ये हा वृक्ष शततारका
नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानतात त्यामुळे याचे केवळ भौगोलिक महत्व नाही तर अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे त्यामुळे हे झाड आपल्या सर्वासाठी विशेष आहे. आपण या झाडाची माहिती घेतलीच आहे
वृक्ष कसे लावता येतील आणि जास्तीत जास्त वाढवता येतील यांसाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवा.
Tree is My Smart Friend.
लेखक व संकलक
विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
जि प शिक्षक