अकरावी CET प्रवेश ऑनलाईन आवेदनपत्रे सुविधा तांत्रिका कारणाने बंद ठेवले बाबत..
सन २०२१-२२ साठी अकरावी प्रवेशासाठी सामायिक CET प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा तांत्रिका कारणाने बंद करण्यात आली असून ही परीक्षा २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे.
CET परिक्षेसाठी २० जूलै पासून आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होत. तांत्रिक कारणास्तव सदरील संकेत स्थळ बंद ठेवण्यात आले आहे सदर सुविधा पुर्ववत केल्यांनतर अवगत करण्यात येणार आहे व परिक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार आहे अशा प्रकारचे पत्र २१/०७/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी काढले आहे.