झाडाचे नांव-4 कडूलिंब
शास्त्रीय नांव- Azadirachta indica
वैशिष्टये- सर्वत्र दिसणारे आणि सर्वांच्या माहितीचे महत्वाचे झाड म्हणजे कडूलिंब चव जरी कडू असली तरी हे औषधाचे महावृक्ष म्हणावे लागेल. कारण हे झाड आपण कधीच लावत नाही ते नैसर्गिक रित्या उगवते.
बहूउपयोगी झाड आहे. २ ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात
लिंबाच्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. झाड आकाराने खुप मोठे होते आणि ते झाड सरळ आणि डेरेदार वाढते.
हवामान– उष्ण् व उबदार वातावरणात हे झाड लवकर येते.
ठिकाण– भारत,चीन पाकिस्तान,बंग्लादेश या देशात हे प्रामुख्याने आढळते.
महत्व– आपण रोज जेवणात वापरताे ते पाने म्हणजे कडीपत्ता हे एक लिंबाची जात आहे. हे झाडांची आपण तैार पाढव्याला खातो. हे झाड हवा शुध्द ठेवण्यासाठी मदत करते. या झाडाला धार्मिक महत्व आहे. कारण पाढव्याला या झाडाची डहाळीची पुजा करतात.
उपयोग– कडू असले तरी औषधी वृक्ष आहे.पाने,फुले,निबोळीपासूनचे तेल,साल,आणि लाकूड हे सर्वच औषधासाठी वापरतात.धान्यात किड लागू नये म्हणून पाला वापरतात.
दात किडू नये यासाठी दंतमंजन साठी वापर होतो.
ऊनाचा त्रास होवू नये व लठठपणा कमी व्हावा यासाठी पाल्याचा रस पितात.
रोज अर्धा कप रस पिल्याने मधुमेह कमी होतो.यक्रुतावर ही उपचार होतो.मुळव्याध पोटातील कृमी होण्यासाठी यांचा औषध म्हणून वापर करतात.
त्वचारोग,जखम बरी व्हावी.,अँटी-इंफ्लेमेटरी गुण देखील आहे
तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.
लाकूड इमारतीसाठी जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, मधुमेह अशा आजारावर गुणकारी आहे.

झाड वाचली पाहिजेत झाडे वाचली तरच आपण वाचू !!!
Tree is My Smart Friend
लेखक व संकलक-
विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
जि प शिक्षक