आपल्याला ब-याच गोष्टी माहित असतात परंतू आपण त्याचा उपयोग आपण आपल्या शाळेतील मुलांसाठी करायला हवा असे वाटते.
.मुलांना आपण जसे घडवू त्याप्रमाणे मुले घडत असतात.आज घडीला शाळेत तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलांना शिकवणे फार गरजेचे आहे हे तंत्रज्ञान आपण ही त्याप्रमाणे वापरावे असे मला वाटते. ब-याच वेळा असे होते की आपणास भरपूर शिकवायचे आहे परंतू सॉप्टवेर माहिती नसते किेंवा कोणते अॅप वापरावे या विषयी आपणास लवकर कळत नाही. आपणही आपल्या स्थानिक परिस्थिती पाहून खालील अॅप किंवा सॉप्टवेअर वापरु शकता. आज मी आपण या विषयी माहिती देणार आहे.
परंतू मुलांना ऑनलाईन शिकताना ब-याच गोष्टीची अडचण ही येणार आहे. नेटवर्क, मोबाईल डाटा, स्मार्ट फोन, योग्य हताळणीचे ज्ञान, संगणक इत्यादी. त्यासाठी प्रथम शिक्षकांना, पालकांना, मुलांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या मनाची तयारी ही गरजेची आहे. किती ही तंत्रज्ञान विकसित झाले तरी आपणास गुरुजी शिवाय कोणता ही पर्याय नाही.
घरी बसून शिकवता येत असले तरी आज ही आपल्या शाळेत तंत्र्ज्ञानाचे साधने उपलब्धता पाहणे गरजेचे आहे.घरी बसून यापैकी आपली गरज पाहून आपण खालील माहिती दिलेले अॅप वापरु शकता.
आपण कोणकोणत्या सॉफटवेअरचा वापर करुन त्यप्रमाणे शिकवू शकतो हे पण पाहिले पाहिजे.
1) फेसबुक – Facebook याचा वापर करुन आपण लाईव्ह पाठ शिकवू शकतो. तसेच पेज तयार करुन माहिती शेअर करु शकतो. व्हिडीओ दाखवून प्रश्न विचारु शकतो.
किंमत – मोफत
क्षमता- अॅनलिमिटेड सहभागी होवू शकतात.
लिंक- https://www.facebook.com/
रेटिंग- ७
2) स्कायप लेसन Skype – मायक्रोसॉफटच्या माध्यमातून आपण स्कायप लेसन घेवू शकतो.
यामध्ये ग्रुप तयार करुन मुलांना शिकवू शकतो., स्वताचा लेसन तयार करुन, व्हच्युअल .लाईव्ह लेसन किंवा प्रत्येक्ष फिल्डवर जावून आपण ही माहिती मुलांना देवू शकतो. जगातील नामवंत शाळातील मुलांकडून,शिक्षकांकडूनही आपण शिकू शकता हे सर्व मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी खाली लिंकवरुन आपण ही माहिती घेवू शकता व स्वताचा लेसन तयार करुन त्याबाबत जगातील कोणत्याही मुलांना शिकवू शकता.
किंमत – मोफत/ विकत
क्षमता- 50 सहभागी होवू शकतात.
लिंक – https://www.skype.com/en/features/calling-and-instant-messaging/
रेटिंग- ९
3) झूम अॅप Zoom – हे अॅप सध्या खूप प्रसिदध झाले आहे. याच्या माध्यमातून आपण मुलांना लाईव्ह माहिती देवू शकतो व मुलांना ही प्रश्न विचारुन त्याच्या अडचणी समजून शिकवू शकता. तसेव यामध्ये ही आपल्या लॅपटॉपची स्क्रीन शेअर करु शकता. आपल्याकडे असणारे चित्रे, चलचित्रे, व इतर सामुग्रीचा वापर करुन माहिती देवू शकता.
किंमत – मोफत/ विकत
क्षमता- 100 सहभागी होवू शकतात.
लिंक – https://www.skype.com/en/features/calling-and-instant-messaging/
रेटिंग ८.५
4) व्हाटसअॅप WhatsApp – हे जरी मेसेंजर अॅप असले तरी आपण याचा वापर आपल्या शाळेत करु शकता. ग्रुप तयार करुन माहिती शेअर करु शकता ज्यांना अडचण आहे त्यांना व्हिडीओ कॉल लावून समस्या दूर करु शकता यामध्ये ग्रुप व्हिडीओ काॅलिग उपलबध नाही. वैयक्तीक माहिती,सामुहिक माहितीसाठी यांचा वापर करु शकता.
किंमत – मोफत
क्षमता- 250 सहभागी होवू शकतात.
लिंक- https://web.whatsapp.com/
रेटिंग- ६
5) गुगल मिट – Google Meet- हे सॉफवेअर ही अापण वापरु शकता हे ही झूप सारखी माहिती देवू शकता आपण आपल्या मुलांना व्हिडीओ कॉल करुन पाठ शिकवू शकतो. याचा वापर ज्यांच्याकडे व्हिडीओ सेवा देणारा मोबाईल नाही त्यांना सुध्दा कॉल करुना माहिती घेते येते. ग्रामिण भागात यांचा वापर करु शकतो.
किंमत – मोफत / विकत
क्षमता- 250 सहभागी होवू शकतात.
लिंक- https://apps.google.com/meet/how-it-works/
रेटिंग- ८.५
6) दिक्षा अॅप- Diksha App – दिक्षा अॅप हे सध्या शासनाने तयार केलेले अॅप आहे हे अॅप विविध भाषेते उपलब्ध आहे. यामध्ये आपल्याच शिक्षकांने काही कन्टेंट तयार केले आहेत ते हया अॅप च्या माध्यमातून वापरता येतात. तसेच यामध्ये असलेले कन्टेट ही आपण वापरु शकता व रोज कोणता पाठ शिकायचा याचे नियोजन देवून आपण मुलांना घर बसल्या माहिती देवू शकतो.व त्यांचा फिडबॅक ही घेवू शकता. यामध्ये 1 ली ते 8 वी पर्यतचा सर्व अभ्याक्रम उपलब्ध आहे.
त्याचा वापर करु शकता.
किंमत – मोफत
क्षमता- अनलिमिटेड
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app&hl=en_IN
रेटिंग- ७.५
7) युटूब YouTube – सध्या जगामध्ये कोणत्याही माहितीचा व्हिडीओ रुपात साठवलेला भरपूर खजाना आपणास उपलब्ध आहे. फक्त हे वापरताना मुलांना सेफऑन सिक्युरिटी चालू करुनच माहिती वापरण्यास देता येईल यामध्ये एकाच गोष्टीचे लाखो व्हिडीओ उपलब्ध आहेत त्यांची निवड करुन लिंक शेअर करु शकतो. हे वापरताना काळजी घेवूनच माहिती दयावी. किंवा जाहिरात ऑफ करुन देता येईल किंवा पेंड व्हर्जन वापरता येईल. मुनांला लाईव्ह ऑनलाईन धडे देता येतील. तेही मोफत आहे
किंमत – मोफत/ विकत
क्षमता- अनलिमिटेड
लिंक- https://www.youtube.com/channel/UC93SSZ2c3S1o584wrgQor6g
रेटिंग- ८.५
दहापैकी रेिटिंगआहे.
यापेक्षा अनेक अॅप आपणास उपलब्ध आहेत आपली गरज पाहून आपण यापेक्षा वेगळे अॅपचा वापर करु शकता.
खूप उपयुक्त माहिती मिळाली सर….मनपूर्वक धन्यवाद.
गुगल मीट चा वापर करून साध्या मोबाईलवर कसे सांगता येईल , शिकवता येईल याची आणखी थोडी माहिती पाहिजे.
छान माहिती सर.निश्चितच यांच्या वापराने अध्यापन सुकर होईल.