शोधा शोधा उत्तर शोधा
प्रश्नाखाली दडलय काय !.
काही तांत्रिक अडचणीमुळे आपण काही दिवस Hide and Seek प्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरे येणार आहेत आपण वाचन करताना प्रश्नाला फक्त टच केले की आपणास आपोआप उत्तर दिसणार आहे.
उत्तरे पाहण्यासाठी प्रश्नाला टच करा.
प्रश्नमालिका 17
१) इस्त्राईल देशातील लोकांची प्रमुख भाषा कोणती आहे? a)इंग्रजी b)अरबी c) हिब्रु d) पर्शियन
c) हिब्रु
2)वैदिक काळातील वर्ण कशावरून ठरत असत. a)रंग b)वंश c)प्रदेश d)व्यवसाय
b) वंश
३) विजेच्या दिव्यातील तंतू (Filament) या उच्च द्रवणांक धातुपासून बनवलेला असतो. a) मॅग्नेशियम b) टंगस्टन c) तांबे d) प्लॅटिनम
c) तांबे
४) तांबे- पितळी भांडयावर कोणत्या थराचा पाताळ थर देतात त्यामुळे भांडयात ठेवलेल्या पदार्थाचा मूळ धातूशी संपर्क न येता पदार्थ टिकतात. a) जस्ताचा b) कथलाचा c) ॲल्युमिनीअमचा d) चांदीचा
b) कथलाचा
५) कोणत्याही वस्तूची सावली निर्माण होते? a) प्रकाशाचे विकीरण होते b) प्रकाशाचे परावर्तन होते c) प्रकाशाचे अपस्करण होते d) प्रकाशकिरण सरळ रेषेत जातात.
d) प्रकाशकिरण सरळ रेषेत जातात.
६) हॅलोजनपैकी कोणता धातू हा एकमेव स्थायू आहे. a) प्लोरिन b) क्लोरीन c)ब्रोमीन d) आयोडीन
d) आयोडीन
७) एका संख्येची ५ पट आणि त्याच संख्येची ८ पट या मधील फरक २७ येत असेल तर ती संख्या कोणती? a) 7 b)8 c)9 d) 10
c)9
८) मी निबंध लिहितो या वाक्याचा रिती भूतकाळ लिहा. a) मी निबंध लिहीत होतो b) मी निबंध लिहित असे c) मी निबंध लिहित होता d) मी निबंध लिहीला
b) मी निबंध लिहित असे
९) देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायचर तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत. a) इंद्रायणी b) प्रवरा c)मुठा d) वैतरणा
a) इंद्रायणी
१० पंचायत राजच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख कोण असतो? a) जि.प. अध्यक्ष b) शिक्षणाधिकारी c) मुख्य कार्यकारी अधिकारी d) सरपंच
c) मुख्य कार्यकारी अधिकारी