जिप शिक्षक बदल्यांचे शासन पोर्टल सुरु शंका व समाधान काही सुचना

बदल्याचे बिगुल वाजले..शिक्षक बदल्यात काही प्रश्नांची उत्तरे

बदल्याचे बिगुल वाजले..शिक्षक बदल्यात काही प्रश्नांची उत्तरे
शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या मार्फत होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी महाराष्ट्र शासननाने वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बदली पोर्टल चालू केले असून
या मध्ये शिक्षकांना स्वतचस्वताची माहिती अपडेट करता येणार आहे व दुरुस्ती करुन स्वताची प्रोफाईल भरता येणार आहे. त्यासाठी बीईओ यांच्या लॉगीन वरुन तपासूनच पडताळणी केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने डिजीटल बदली प्रक्रियेसाठी फार महत्वाचे पाऊल उचलले आहे.
बदली पोर्टल भरताना कोणती काळजी घ्यावी याचे माहिती आपणास असणे गरजेचे आहे त्यासाठी शासनाची हि वेबसाईट वेळोवेळी भेट देणे गरजेचेआहे.
खालील प्रमाणे स्टेप बाय स्टेप माहिती आपणास बदली पोर्टलची थोडक्यात माहिती देत आहोत.
अ)आपला मोबाईल टाकून लॉगिन करून पाहावे*
https://ott.mahardd.in/

ब)मोबाईल नंबर जो आपण माहिती मध्ये दिला होता तो टाकून otp येईल (त्यासाठी किमान ९ मिनिट थांबावे जर ओटीपी आला नाही तर) त्यानंतर लॉगिन करावे व माहिती अपडेट*
*करावी*

क)यामध्ये 2 प्रकारची माहिती आहे.

1) personal details – यातील माहिती बदलता येणार नाही
2) Employee details*

३)यातील माहिती आपण बदलू शकतो, मात्र त्याचे अप्रुवल Beo यांना द्यावे लागेल, त्यांनी अप्रुवल दिले किंवा त्यात काही बदल केला तर शिक्षकाला sms द्वारे नोटोफिकेशन येईल.*
४)शिक्षक स्वतःच्या माहिती मध्ये बदल किंवा माहिती ऍड दिनांक 13 ते 20 जून पर्यंत phase 1 मध्ये पोर्टलला करू शकता*
५) शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली शिक्षक बदली प्रक्रियेसाठी मार्गदर्शक विडिओ आपणास लवकरच शासनस्तरावरुन मिळणार आहेत. इतर व्हिडीओ आपणास किती ही आले तरी आपण फक्त शासन वेबसाईटचाच वापर करावा. किंवा शासनाने दिलेले व्हिडीओच पाहावेत. इतर व्हिडीओत चुकीची माहिती मिळू शकते.
पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न…
१)जेव्हा शिक्षक पहिल्यांदा लॉग इन करतात तेव्हा काय होते*?
पहिल्यांदा पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, शिक्षक प्रथम अस्वीकरण संदेश पाहू शकतो जो त्याला स्वीकारणे आवश्यक आहे. जेव्हा शिक्षक प्रोफाइल टॅबवर क्लिक करतो, तेव्हा शिक्षकाला महत्त्वाच्या नोट्स दिसू शकतात ज्या शिक्षकाने स्वीकारल्या पाहिजेत.

२)शिक्षकाला त्याचा/तिचा प्रोफाइल डेटा कुठे मिळेल* ?
शिक्षकाने TT पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, डाव्या मेनूमधून प्रोफाइलवर क्लिक केल्यावर तो त्याचे प्रोफाइल पाहू शकतो आणि ते संपादित करू शकतो.

३)शिक्षकाची प्रोफाइल मधील माहिती बरोबर किंवा पूर्ण नसल्यास अपडेट कशी करावी* ?
शिक्षकाने TT पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, शिक्षक डाव्या मेनूमधून प्रोफाइलवर क्लिक करू शकतात, ते अपडेट करू शकतात आणि मंजुरीसाठी तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात.

४)शिक्षकांच्या प्रोफाइलचे स्वरूप काय आहे* ?
शिक्षकाचे प्रोफाइल 2 पृष्ठांमध्ये विभागलेले आहे (फॉर्म):
1. कर्मचार्‍यांचे तपशील – शिक्षकाची वैयक्तिक माहिती (ही माहिती बदलता येणार नाही)
2.नोकरी तपशील – शिक्षकांचे नोकरी-संबंधित तपशील (शिक्षक या फील्डमध्ये बदल करू शकतात)
५) शिक्षक शिक्षकाच्या प्रोफाइलमध्ये शिक्षण अधिकाऱ्याने ने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास काय करावे* ?
गट शिक्षण अधिकाऱ्याने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास शिक्षक शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात.
६)शिक्षक त्याचे प्रोफाइल किती वेळा बदलू शकतात*?
गट शिक्षण अधिकाऱ्याला प्रोफाइल पाठवण्यापूर्वी शिक्षक फक्त एकदाच फील्ड बदलू शकतात. त्यानंतर, शिक्षक फक्त अपीलसाठी शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात, परंतु त्यानंतर प्रोफाइल बदलू शकत नाहीत.
७) शिक्षण अधिकाऱ्याने प्रोफाइल बदलल्यानंतर शिक्षक त्यांचे प्रोफाइल बदलू शकतात का* ?
नाही. प्रोफाईल केवळ शिक्षण अधिकाऱ्याच्या पुनरावलोकनानंतर केवळ ‘वाचनीय’ मोडमध्ये उपलब्ध आहे.
८)तुम्हाला अजूनही सहकार्याची गरज आहे का?
होय असेल तर खालील मेलवरच संपर्क साधावा इतर कोठेही आपली माहिती शेअर करु नये.
संपर्कासाठी मेल आयडी ottsupport@vinsys.com

वरील माहिती खरी असेलच असे नाही आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावूनच स्वताच सर्व माहितीची खात्री करावी. व त्यानुसार वरील सुचना लक्षात घ्याव्यात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top