झाडाचे नांव-आपटा
शास्त्रीय नांव- Bouhinia racemosa
वैशिष्टये-आपटयाला एका पानाला दोन भाग असतात. १६ व्या शतकातील वनस्पतीतज्ञ व शास्त्रज्ञ या जॉन व कॅस्पर बौहिन या दोन भावाच्या नावावरुन हे नाव देण्यात आले आहे अशी माहिती
आढळते. आपटयाचे झाड हे सरळ आणि वेडे वाकडे वाढते या झाडाला शेंगा येतात.जानेवारी ते एप्रिल या महिन्याच्या सुमारास लहान पांढरी फुले येतात.फुलाला पाच पाखळया आणि दहा पुकेसर असतात.१२ महिने हे झाड हिरवे गार राहते.
हवामान- हे उष्ण दमट,थं ड अशा वातावरणात वाढते.
ठिकाण- भारत,श्रीलंका चीन या देशात हे झाड आढळून येते. हे झाड सदाहरित असून ते वर्ष भर हिरवेगार असते
महत्व/उपयोग – आपटा हे झाड औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. झाडाच्या बिया,फुले,साल हे औषध म्हणून वापरतात.सालीपासून दोरखंड,डिंक मिळवला जातो. तसेच गुजरात राज्यात या पानाचा उपयोग बिडी बनवण्यासाठी केला जातो
आपटयाला संस्कृत मध्ये अश्मंतक हे नाव आहे यांचा अर्थ दगडाचा, खडकाचा नाश करणारा असा होतो.तसेच मुतखडा होवू नये यासाठी उपयोग होतो. तसेच धन्वतरी मध्ये निघण्टूमध्ये औषधी उपयोग असे दिसत आहे.
आपटयाच्या झाडाची पाने ही सोने म्हणून दसरा या सणाला वाटतात. आणि आपटा हे महावृक्ष म्हणून ओळखले जाते. म्हणून आपण या झाडाची लागवड डोंगर दऱ्या,घराशेजारी,शेतीत करु शकता.

जोतिषामध्ये हा वृक्ष शततारका
नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानतात त्यामुळे याचे केवळ भौगोलिक महत्व नाही तर अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे त्यामुळे हे झाड आपल्या सर्वासाठी विशेष आहे. आपण या झाडाची माहिती घेतलीच आहे
तर आज दसऱ्याला हे झाड खोडून पडणार नाही यांची काळजी घ्या आणि वृक्ष कसे लावता येतील आणि जास्तीत जास्त वाढवता येतील यांसाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवा.
Tree is My Smart Best Friend.
लेखक व संकलक
विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
जि प शिक्षक