स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथे भरणार प्रथमच राज्यस्तरीय अक्षर संमेलन……

पंढरपूर- महाराष्ट्रात प्रथमच अक्षर संमेलनाचे आयोजन केले आहे. माझी शाळा माझा फळा व्हॉटसॲप/फेसबुक समूह व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित राज्यस्तरीय प्रथमच अक्षर संमेलन २८ व २९ मे रोजी होणार आहे.
अक्षरांची गोडी…माणसे जोडी हे ब्रीद वाक्य वाक्य घेवून अक्षरप्रेमी,अक्षरसम्राट मा. अमित भोरकडे यांनी महाराष्ट्रातील सर्व कलाकरांना प्रथमच एकत्र आणण्यासाठी व अक्षराच्या माध्यूमातून एकत्र गुफंण्याचा
प्रथमच प्रयोग केला आहे. मा. अमित भोरकडे सर हे गेल्या १५ वर्षापासून रांगोळीकार,चित्रकार,सुंदर अक्षर लेखन करुन महाराष्ट्रातील विदयार्थ्यांना धडे देत आहेत.
महाराष्ट्रातील सर्व अक्षरप्रेमी हे केवळ शिक्षकच नाहीत तर ते आपआपले कामकाज पाहून व्यवसाय पाहून परीवारासह या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाला स्वताच्या खर्चाने उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रराज्य महसूल व वनविभागाचे सहसचिव मा. संजय इंगळे हे लाभले आहेत. मा.प्रशांत वाधमारे हे स्वागताध्यक्ष आहेत.तर उदघाटक म्हणून डॉ.बी.पी.रोंगे साहेब स्वेरी इंजिनिअरींग कॉलेज गोपाळपूर व मा. भारत माळी संस्थ्ससपक अध्यक्ष सावित्रीबाई चित्रकला महाविदयालय पंढरपूर हे उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात राहून अक्षरलेखन करणारे कलावंत यांचा भव्य दिव्य सन्मान होणार आहे.अक्षर आणि जीवन यावर चर्चा होणार आहे, व्यक्तीचित्र रेखाटन प्रात्यक्षिक-

संमेलनात भरगच्च असा कार्यक्रम होणार आहे.
उपस्थिती नोंदणी व स्वागत अक्षरप्रदर्शन उद्घाटन सोहळा
सकाळी ११.०० वा. : अक्षर संमेलन उद्घाटन
शुभहस्ते-मा. डॉ. बी. पी. रोंगे (प्राचार्य, स्वेरी कॉलेज ऑफ इंजि. पंढरपूर)
प्रमुख उपस्थिती-मा. भारत माळी (संस्थापक अध्यक्ष, सावित्रीबाई चित्रकला विद्यालय, पंढरपूर)
व सर्व ज्येष्ठ अक्षरमित्र ,दुपारी १२.०० वा. मुक्तचर्चा विषय अक्षर आणि जीवन-सहभाग: ज्येष्ठ सुलेखनकार,दुपारी 9.00 ते 3.00 : भोजन दुपारी ३.०० वा. फलक लेखन : व्यक्तीचित्र रेखाटन प्रात्यक्षिक
सहभाग
देव हिरे (नाशिक), दिगंबर अहिरे (नाशिक), अजय जिरापुरे (अमरावती),सायं. ५.३० वा. सामुहिक सुलेखन : चला, आपणही लिहूया ! (टीप: सर्वांनी आपले लेखन साहित्य सोबत आणावे)
सायं. ७.०० : अक्षरगणेशा प्रात्यक्षिक-सादरकर्ते : ज्ञानेश्वर कवडे (अहमदनगर) व आशिष तांबे (मुंबई),सायं. ७.३० वा. मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी ! सादरकर्ते: स्वाक्षरीकार गोपाळ वाकोडे (बुलढाणा)
रात्री ८ ते ९ : भोजन,रात्री ९ ते ११ : संगीत मैफील,रविवार, दि. २९ मे २०२२ सकाळी ९.३० वा.,सुलेखन प्रात्यक्षिक-सादरकर्ते : सुलेखनकार अनिल गोवळकर (मुंबई)
सकाळी ११.३० वा. : अक्षर रांगोळी प्रात्यक्षिक-सहभाग :गणेश माने (पुणे), दिपक दिक्षित (जालना), योगेश उमवणे (मुंबई),मल्लिनाथ जमखंडी (सोलापूर), वैशाली पवार (मुंबई) मोहीत पोवार (पुणे)
100 दु.१ ते २.३० : भोजनदु. ३.०० ते ६.०० : अक्षर सन्मान सोहळा-अध्यक्ष मा. संजय इंगळे (सहसचिव, महसुल व वनविभाग, महाराष्ट्र राज्य) शुभहस्ते मा. प्रशांत परिचारक (माजी आमदार, पंढरपूर)
प्रमुख उपस्थिती : मा. दिलीप स्वामी (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सोलापूर) मा. डॉ. किरण लोहार ( प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. सोलापूर) मा. डॉ. बी. पी. रोंगे सर (प्राचार्य, स्वेरी कॉलेज, पंढरपूर)
सायं.६.०० वा. : आभार व समारोप-
मी असतो सदा अक्षरांच्या प्रेमात कारण ही अक्षरंच मला आता बांधतात नात्यात. क्षणात आणि एखादयाच्या मनात
॥ आम्ही अक्षरांबरोबर… अक्षर ते आमच्याबरोबर । निमित्त ते लेखनाचे… काळीज उतरने कागदावर ॥ असे अमितजी सरांच्या लेखनाचे वैशिष्टये आहे.
महत्वाची सूचना
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक.
• सदर संमेलनामध्ये सहभागी होणेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (नावनोंदणी) करणे आवश्यक आहे. सोबत रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण झाली आहे. • सहभागी सर्वांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था आहे.•पिण्याच्या पाण्यासाठी बाटली सोबत आणणे आवश्यक आहे.
आवश्यक कपडे, पांघरुण तसेच आकर्षक Calligraphy T-shirt सोबत आणावे. कॉलेज कॅम्पसमध्ये आपणामुळे कोणालाही त्रास होवू नये याची काळजी घ्यावी.
• संमेलन ठिकाणी Calligraphy, फलकलेखन वर आधारित विविध पुस्तकें Calligraphy Tools, Pen, Chalk, Soft Pastels, Ink, इ. विक्रीसाठी उपलब्ध आहे.
• सहभागी सर्वांना मराठी स्वाक्षरी, अक्षरगणेशाची कलाकृती व इतर काही साहित्य संमेलन भेट म्हणून देण्यात येणार आहे. • नोंदणी झाल्यानंतर स्वतंत्रपणे एक व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये सहभागी करुन इतर सूचना
वेळोवेळी कळविल्या जातील. पूर्वनियोजन : दि. २७ मे रोजी मुक्कामी येणार असल्यास पूर्वकल्पना द्यावी.
काही मदत हवी असेलतर खालील मोबाईल नंबर संपर्क -करावा असे अवाहन करण्यात आले आहे.
अमित भोरकडे मो. ७५८८५०४८५२ ज्ञानेश्वर विजागत मो. ९३०९७९७९५९ प्रशांत वाघमारे मो. ९८६०७८६७३५ यासाठी स्वच्छंद ग्रुप मंगळवेढा,सोलापूर अक्षरप्रेमी मित्र, गिरीजा नाईकनवरे,प्रशांत वाघमारेसर,ज्ञानेश्वर विजागत,सावळकर अंबादास,अमित वाडेवकर सर, दिपक इरकर,सिध्देश्वर मेटके हे परिश्रम घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top