TAIT EXAM 2023

शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत.सविस्तर माहिती खालील प्रमाणे काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा.

लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे

 उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेला पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.

 ऑनलाइन चाचणी/मुलाखतीसाठी प्रवेश कागदपत्रांच्या पडताळणीशिवाय पूर्णपणे तात्पुरता असेल.

 अर्जाचा फॉर्म (शुल्क भरण्याचे तपशील असलेले) आणि ई-पावती उमेदवाराने मुद्रित करून त्याच्या/तिच्याकडे संदर्भासाठी ठेवावी.

 कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नये. एकाधिक अर्जांच्या बाबतीत, फक्त नवीनतम वैध (पूर्ण) अर्ज ठेवला जाईल आणि

इतर एकाधिक नोंदणीसाठी भरलेले अर्ज शुल्क/सूचना शुल्क जप्त केले जाईल.

ऑनलाइन परीक्षेच्या तारखेच्या माहितीसाठी उमेदवारांना नियमित अंतराने MSCE च्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.

 उमेदवारांना MSCE च्या वेबसाइटवरून ऑनलाइन चाचणी आणि माहिती हँडआउट (IH) साठी कॉल लेटर डाउनलोड करावे लागेल.



MSCE प्रतिसाद, प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादींवर अवलंबून कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करण्याचा आणि/किंवा इतर काही केंद्रे जोडण्याचा अधिकार राखून ठेवते. MSCE उमेदवाराला एका केंद्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही केंद्रावर वाटप करण्याचा अधिकार देखील राखून ठेवते. तो ती ची निवड केली आहे.

 कृपया नोंदणीशी संबंधित ईमेलसाठी तुमचे जंक ई-मेल फोल्डर तपासण्याचे सुनिश्चित करा. इतर तपशिलांसाठी, कृपया वर तपशीलवार जाहिरात पहा

MSCE ची वेबसाइट. Phone No.-020-26123066/67 Email: msce.tait2022@gmail.com Website: www.mscepune.in

 

१. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क

 

दिनांक ३१/०१/२०२३ ते दिनांक ०८/०२/२०२३ दि. ०८/०२/२०१३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत भरण्याकरीता अंतिम दिनांक

 

प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा दिनांक १५/०२/२०२३ पासून कालावधी

ऑनलाईन परीक्षा दिनांक

दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)

 

२. उपलब्ध पदसंख्या : राज्यातील शिक्षण सेवकांच्या/शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली नुसार ‘पवित्र’ (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.

 

३. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः ३.१ परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इ मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.

३.२ अभ्यासक्रम: सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील. याबददल स वि स्तर माहि ती दिली जाईल.

अ) अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (मनी) भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील

ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्टस्तर मर्यादा असणार नाही.

 

क) परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा ( १२० मिनिट) कालावधी राहील.

 

५. २ वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/शिक्षकांना लागू होईल.

 

५.३ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७/ टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे २०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/ टीएनटी-०१, दि. १०/११/२०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणान्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणान्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

६. निवड प्रक्रिया: परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील (प्राथमिका उच्च प्राथमिका माध्यमिक/उच्च

माध्यमिका अध्यापक विद्यालय / रात्र शाळा) पद भरतीसाठी ग्राहय धरण्यात येतील. शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सी.ई.टी. २०१५/प्र.क्र.१४९/ टीएनटी-१, दि. ०७/०२/२०१९, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/ टीएनटी-१, दि. १०/११/२०२२ तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राहील. शिक्षण सवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सी.ई.टी.

१४९/ टीएनटी-१, दि. ०७/०२/२०१९, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टीएनटी-१, दि. १ तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राहील.

 

७. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः

७.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात  या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक अहे

७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.

७.३ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील. (अ) पासपोर्ट साईज फोटो- उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 200X300 pixels फाईल साईज 20kb 50kb (ब) स्वाक्षरी- उमेदवाराने त्याची पांढन्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स अपलोड करणे आवश्यक आहे. आकारमान 140X60 pixels फाईल साईज 10kb 20 kb

 

(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी- उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी X ३ सेमीपांढन्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.आकारमान 240X240 pixels in 200 DPI फाईल साईज 20kb 50kb

(क) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 800X 400 pixels in 200 DPI फाईल साईज – 50kb – 100 kb

७. ४ परीक्षेचे शुल्क :

१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-

२. मागासवर्गीय/ आर्थिक दृष्टया दुर्बल घटका अनाथ/ दिव्यांग उमेदवारः रु. ८५०/- ३. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

७.५ जिल्हा/ परीक्षा केंद्र निवडः अर्ज सादर करतांना ३ (तीन) जिल्हा/परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा/ परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा/ परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा/ परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसन्या जिल्हा/ परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.

 

८. प्रवेशपत्र :

८.१ परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील, त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही

उमेदवार टिईठी पास नसेल तरी परीक्षा देवू शकतो का?
उत्तर- होय. कोणता ही उमेदवार /परीक्षार्थ्यी TAIT परीक्षा देवू शकतो परंतू तो CTET किंवा TET परीक्षा बसलेला असावा किंवा निकाल राखून ठेवलेला असावा.
परीक्षा फॉर्म भरताना खालील माहिती सोबत घेवून जावी. सविस्तर माहिती खालील प्रमाणे काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा.
उदा. दहावी-शाखा-बोर्डाचे नांव- विषय- पास दिनांक-टक्केवारी-ग्रेड याप्रमाणे SSC,HSC,BA,MA,B.ED ,D.ED,M.ED,PH.D,M.PHIL, MSCIT, तुमच्याकडे जेवढे सर्टीफिकेटस आहेत तेवढे प्रमाणपत्र सोबत घेवून जावे.
आपणास काही अडचण आली तर आपण संपर्क करु शकता. सविस्तर माहिती दिली जाईल.
सोबत- कोऱ्या कागदावर अंगठा व इंग्रजीतील घोषणपत्र स्वहस्ताक्षरात लिहून जावे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top