सदर अभियोग्यता चाचणी परीक्षेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सीईटी २०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक :०७ फेब्रुवारी, २०१९ या शासन निर्णयान्वये अभियोग्यता परीक्षा घेण्यात येणार आहेत.
9) अभियोग्यता चाचणी व शिक्षण सेवक निवड प्रक्रिया संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात येणार आहे.
२) या कार्यपध्दतीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था (यापुढे “शैक्षणिक संस्था” असे वाचावे.) यांना त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना आरक्षण विषयक बाबी विचारात घेऊन पदांची जाहिरात शासनाच्या संकेतस्थळावर संगणकीय प्रणालीवर किमान कालावधीकरीता प्रसिध्द करावी लागेल.
३) अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून उमेदवारास त्याच्या गुणांमध्ये वाढ करण्याची त्याच्या सेवाप्रवेश वयोमर्यादेत ५ वेळा संधी उपलब्ध होईल.
४) अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार नाही. सदर चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारास, शैक्षणिक संस्थेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करता येईल.
५) संस्थेच्या जाहिरातीस प्रतिसाद दिलेल्या उमेदवारांची, अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या ●आधारे ज्या विषयासाठी शिक्षण सेवक म्हणून अर्हताप्राप्त उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे त्या विषयनिहाय गुणवत्ता यादीतील अग्रक्रमानुसार शिक्षण सेवक म्हणून निवड सदर संस्थेस करावी लागेल.
६) (9) शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक पध्दतीने व विहीत कालमर्यादेत्त होईल. शिक्षकांच्या भरती
खालील प्रमाणे परीक्षेचे स्वरुप राहील.
अभ्यासक्रमात दोन भाग असतील अ आणि ब जसे
- घटक-अभियोग्यता-शेकडा प्रमाण-60% एकुण गुण १२० वप्रश्न संख्या १२० प्रत्येकी १ गुण.
ब- घटक-बुध्दीमत्ता-शेकडा प्रमाण-40% एकुण गुण ८० वप्रश्न संख्या ८० प्रत्येकी १ गुण.
अ+ब= 200 प्रश्नांची उत्तरे दयावी लागतील. यामध्ये येणारे घटक हे स्कॉलरशिप ,नवोदय, १ ते ८ च्या पाठयपुस्तकावर आधारित असतील.त्यानुसार आपण परीक्षेची तयारी करणार आहोत. खालील प्रमाणे घटक.
अ) अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल
वरील परीक्षेच्या आधारे आपण यावर प्रश्नमालिका सुरु करीत आहोत..
सदरील पोस्ट ही अभियोग्यता परीक्षेसंबधी माहिती व्हावी यासाठी लेखन केली आहे. आपणास काही समस्याकिंवा आपणाकडील काही लेख असतील नावासह प्रसिध्द केले जातील.
खालील प्रमाणे परीक्षेचे स्वरुप राहील.
अभ्यासक्रमात दोन भाग असतील अ आणि ब जसे
अ- घटक-अभियोग्यता-शेकडा प्रमाण-60% एकुण गुण १२० वप्रश्न संख्या १२० प्रत्येकी १ गुण.
ब- घटक-बुध्दीमत्ता-शेकडा प्रमाण-40% एकुण गुण ८० वप्रश्न संख्या ८० प्रत्येकी १ गुण.
अ+ब= 200 प्रश्नांची उत्तरे दयावी लागतील. यामध्ये येणारे घटक हे स्कॉलरशिप ,नवोदय, १ ते ८ च्या पाठयपुस्तकावर आधारित असतील.त्यानुसार आपण परीक्षेची तयारी करणार आहोत. खालील प्रमाणे घटक.
अ) अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल
वरील परीक्षेच्या आधारे आपण यावर प्रश्नमालिका सुरु करीत आहोत..
सदरील पोस्ट ही अभियोग्यता परीक्षेसंबधी माहिती व्हावी यासाठी लेखन केली आहे. आपणास काही समस्याकिंवा आपणाकडील काही लेख असतील नावासह वेबवर प्रसिध्द केले जातील.