Terminalia Arjuna Arjun Tree

आजचे झाड-अर्जुन - स्मार्ट ट्री

शास्त्रीय नांव -Terminalia arjuna

वैशिष्टये- अर्जुन नावाप्रमाणे हे वृक्ष खुपच चमत्कारी आणि एक आगळेवेगळे झाड आहे. या झाडाचे शास्त्रीय नांव
Terminalia Arjuna हे आहे.याझाडाला अनेक नावाने ओळखले जाते कारण याचे अनेक चमत्कारी उपयोग आढळतात.देवसाल,धनंजय,पार्थ,शक्रतरु,क्षीरस्वामी,इत्यादी. नावे आहेत.

हवामान– भारतीय हवामानात 6 महिने पाऊस असणारे ठिकाणी
हे झाड येते/उगवते
ठिकाण– भारतात हिमालय, पर्जन्यमान जास्त असणाऱ्या ठिकाणी येणारे वृक्ष

महत्व-वैशिष्टये- हे झाड वयात आले की याची साल गळते ही सााल आरोग्याला खूपच गुणकारी असते. त्यामुळे त्या सालीला देवसाल असे ही म्हणतात.पाण्याच्या ठिकाणी हा वृक्ष आढळतो.
वृक्षाच्या वाढलेल्या मोठया फांद्या थोडया खाली झुकलेल्या असतात. समोरासमोर देठ असलेली व थोडा लांबट आकार असलेली किंचित फिकट हिरवी पाने, या पानांच्या मागे देठाजवळ, मधल्या शिरेच्या दोन्ही बाजूस गोगलगाईच्या शिंगाप्रमाणे दिसणाऱ्या दोन लहान ग्रंथी हे याचे वैशिष्टय आहे.अर्जुनाला पंख्यासारखी छोटी फळे वा बिया असतात.

उपयोग-उपयोग- मध्य प्रदेशात अर्जुन वृक्ष हा संरक्षित वृक्ष म्हणून वनखात्याच्या अनुज्ञेविना तोडता येत नाही
हदयरोगावर गुणकारी,फुलापासून उत्ताम नेत्राजन बनवतात.या सालीचा वापर प्रामुख्याने प्रयोगासाठी जास्त प्रमाणात वापरतात. या झाडाचा उल्लेख अनेक ग्रथामध्ये आढळतो.

झाड वाचली पाहिजेत झाडे वाचली तरच आपण वाचू !!!

Tree is My Smart Friend

लेखक व संकलक-
विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
जि प शिक्षक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top