“मैत्री माहिती तंत्रज्ञानाशी” नविन लेख मला आपणास मिळणार आहेत.यात तंत्रज्ञानाशी असलेली माहिती आपणास मिळणार आहे
भाग १- फेक लिंक कशा ओळखाव्यात.?
आजच्या आधुनिक युगात बरेच जण स्वताचे वेबपोर्टल किंवा ब्लॉग लेखन करत असतात. काहीजण यामध्ये कॉपी पेस्ट करुन किंवा स्वताच्या वेबसाईटला टर्मिनेट करत असतात. आज आपणास अशा अनेक लहान गोष्टीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण आजचे युग हे केवळ तंत्रज्ञानाचचे नाहीत तर त्यात आपण कसे सुरक्षित राहू हे पाहणे, शिकणे गरजेचे वाटते. कारण येणारा काळ हा डिजीटल युगाचे असेल त्यात आपण जे करतो ते सगळे ओपन सोर्स असेल. आताही ओपनसोर्स आहे पण ते सध्या मर्यादित आहे.
आज आपणास इंटरनेट शिवाय जेवण जात नाही किंवा नेट नसेल तर आपण बैचेन होतो. आज आपण वापरणार हे तंत्रज्ञान एकमेकांना खुपच जवळ घेत असेल तरी आपण एकमेकापासून खुपच दूर जात आहेात हा येणारा काळच ठरवेल.
आज आपण नेट सर्वात जास्त वापरतो. आज जगात सर्वात जास्त भारत हा इंटरनेट वापरणारा दोन नंबरचा देश आहे.त्यामुळे आपण हे नेट वापरताना या मायाजाल मध्ये किेंवा नेटवर्कमध्ये वावरत असताना बऱ्यावेळा आपणासलिंकसशी संबंध येतो. हया लिंकवर क्किल करा, आमुकतमुक माहिती मिळेल,असे सांगत असतात आणि लिंकवरुन डाटा चोरुन आपला मोबाईल किंवा डाटा चोरु शकतात. त्यासाठी आपण फेकलिंक कशा ओळखाव्यात त्यासंदर्भात आपण माहिती घेऊ.
आज टेलिग्राम,व्हॉटसॲप,फेसबुक,लाईन, इनस्टाग्राम यांच्या लिंक इतर शॉर्टिलिंक करणाऱ्या थर्ड पार्टी वेबपोर्टल वापरुन आपणास फसवले जाते. शॉर्टलिंक करणाऱ्या वेबपोर्टलचा आपणास फायदा म्हटलं तर ते आपली मोठी लिंक छोटी करतात. म्हणजे शॉर्ट करतात.परंतू ती लिंक कोणत्या वेबवरुन किंवा कोणत्या वेबसाईटची लिंक आहे हे आपणास ओळखयला येत नाही. अशा लिंक्स आपण पाहत नाही .सदरील लिंकला आपण लगेच क्किक करुन माहिती पाहत असतो.यात bitly,rebrandly,bl.ink,golinks,t2m,pixelme,jelly linkin अशा अनेक लहान लिंक करण्याच्या वेबसाईट आहेत. यांचा वापर लिंक लहान करणे किंवा ओरीजल लिंक लपवणे आणि लिंक लांबी कमी करण्यासाठी वापरतात.किंवा स्वताची वेबसाईट आहे हे लपवून ठेवतात.किंवा कोणी ओरीजनल वेबसाईट लिंक लपवण्यासाठी सर्रास वापर केला जातो त्यामळे आपणास मुख्य लिंकंस कळत नाहीत. वरील पोर्टल च्यालिंकस कळल्या की आपणास समजून जाईल.
अशा अनेक लिंक आल्या तर कशा ओळखाव्यात
१) सध्या Bitly या लिंकचा वापर सर्रस केला जातो. bitly सारख्या वेबसाईटस आपल्या लिंक जरी लपवून लांबी कमी करणारी सेवा देत असल्या तरी यात फेक लिंक असतात. कारण आपणास फक्त बिटलीचीच लिंक दिसते.
२) आपण ज्या वेबसाईटला भेट देत आहात त्या वेबसाईटवर पत्ता,संपर्कक्रमांक,मॅप, आमच्याबददल माहिती असते त्या वेबसाईट अंशत:खऱ्या असतात.
३) वरील आकृतीमध्ये आपण लॉक दिसत असेल सदरील वेबसाईट वापरण्यास अंशत: सुरक्षित आहे. असे समजावे.
४) वरील वेबसाईटमध्ये आपण https:// मधील S आपण हे वेबसाईट वापरणे सुरक्षित आहे अशी माहिती देते. https://esmartguruji.com/blog/ ही जी लिंक आहे ती मोठी आहे परंतू त्यात कोठेही लिंक दुसरीकडे वळवली नाही हे दर्शवते. किंवा शॉर्ट केली नाही हे वेबॲड्रेस वरुन कळते.
५) आज आपण Whatsapp ला अनेक लिंक पाहत असतो. त्यात लिंक वेगळी असते आणि चित्र वेगळे असते.
खाली लिंक मध्ये दिसत आहेत यात हया लिंकमध्ये दुसऱ्या वेबसाईटचे लिंक हाईड आहेत.
त्या फेक आहेत आणि सुरक्षित नाहीत कारण त्यात http च्या पुढे S नाही ( S हे सुरक्षित वेबसाईट आहे याचे चिन्ह आहे)
खालील लिंकवर जावून मोफत डाटा घ्या रिचार्ज करा असे काहीतरी लिहीतात परंतू यात असे काहीच नसते.आपणास फक्त वेबसाईट भेट देणे किंवा तुमच्या मोबाईलची माहिती घेणे हाच उददेश असतो.
आता वेबपोर्टल मध्ये एखादी पोस्ट करताना मेटा डिस्क्रीपशन मध्ये माहिती भरावी लागते तीच पोस्ट शेअर करताना दिसत असते.जसे खालील पिचर मध्ये दिसत आहे.त्यावरुनच ही लिंक कोणत्या वेबसाईटची आहे कळत आहे.खालील पहिला बाण दाखवलेला आहे ती मेनलिंक आहे.
वरील पिचर मध्ये खालील बाण दाखवलेला आहे तेथे मूळ म्हणजे ओरिजन वेबसाईटची लिंक दिसत असते.तयाच्या खालील साईडला कितीही लिंकस असु दया वरील थम्बलमध्ये ओरीजनल लिंक दिसत असतेच. त्यावरुन लिंक कोणत्या वेबसाईटची आहे हे समजते. आपणास अशा लिंकस आपल्या ओळखीची लिंक असतील तरच ओपन करा. नाहीतर करु नका.
विविध शासनाच्या लिंक असतात परंतू काही वेबसाईटला भेट देण्यासाठी आणि प्रायव्हेट लिंकला भेट दिल्याने व्हिवर वाढावेत यासाठी अशा लिंकला शॉर्ट करुन लिंक पाठवल्या जातात. सध्या अशा लिंकचा सुळसुळाट आहे. त्यामुळे शॉर्टलिंक वापरु नये.
कोणती काळजी घ्याल…
ज्या ओरिजनल लिंक नाहीत तया लिंक ओपन करु नका.
लिंक शॉर्ट असतील तर लिंक ओपन करु नका.http च्या पुढे S असेल तरच ओपन करा.
कोणत्याही लिंक वर स्वताची किंवा बँक डिटेल्स भरु नका. कोणालाही पासवर्ड देवू नका अथवा ओटीपी सांगू नका.
कोणी फोनवरुन आपल्या कार्डबददल किंवा विविध बँक संबधी माहिती विचारत असेल कधीच सांगू नका.
शार्टलिंकपासून सावध रहा.
आपण जर लिंक ओळखल्या नाहीत तर आपले मोठे नुकसातन होवू शकते.जसे की आपल्या मोबाईल मधील डाटा चोरु शकतात.
लकी ड्रा,बक्षीस लागले,लॉटरी आहे, पैसे कमवा अशा प्रकारच्यालिंकस हया फेक असतातच. तसेच ऑफिसि यललिंक आपणासमा हि त असणे गरजेचे असते.
सरकारी योजनेच्यालिंकस हयांना gov,org असे असते. डॉट कॉम हे आर्थिक
डोमेन आहे हे ओळखावे.
आपणास असेच अनेक दर्जदार लेख मिळणार आहेत.
आपणास ही माहिती कशी वाटली त्याबददल नक्कीच काँमेट करा.