जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती होणार

पुणे- जिल्हा परिषदेच्या शाळेत आता सेवा निव़त्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती होणार असून यासाठी शासनानने ७ जुलै २०२३ रोजी परीपत्रक काढले आहे.यामुळे शिक्षणात काही बदल होईल की नाही याबददल शिक्षण तज्ञाचे अनेक मतांतरे असून सेवा निव़त्त शिक्षक हे काम करतील का? किंवा त्यांना काम होणार का? हे मजेशीर प्रश्न सर्वाना पडत आहेत. त्याच बरोबर अनेक सेवा निव़त्त शिक्षकाची भेट घेवून याबदल माहिती सांगितली असता त्यांनी आपणास याबददल जास्त माहित नाही आणि आता आम्हाला या काम पहिल्यासारखेच होईल यावर शंका उत्पन्न केली.
परीपत्रकात खालील अनेक मुददे स्पष्ट केले असूल यरमध्ये मुलांचे नुकसान होणार नाही ही बाब लक्षात घेवून असा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच अनेक बेरोजगार असताना मग ही कंत्राटी भरती कशाला ही असा प्रश्न विदयार्थ्यांकडून करण्यात येत असून संताप व्यक्त केला आहे. कारण काही तरुण शिक्षक सीबीसी/इतर खाजगी शाळेत केवळ दहाहजार ते पंधराहजार पगारावर काम करत आहेत.
अशा शिक्षकांना कंत्राटी पदावर नेमले तर चांगले झाले असता खाजगी शाळेतील एका शिक्षकांनी याबाबत सांगितले.

राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिन्यात सुरु झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, नियोजित शिक्षक भरती संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे खालील तरतूदींप्रमाणे भरण्यात यावीत.
१) सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील.
२) मानधन रु. २०,०००/- प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त)
३) जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.
४) बंधपत्र/हमीपत्रः नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, या आशयाचे बंधपत्र/हमीपत्र घेण्यात यावे. या

Scroll to Top