मंत्रालयात सुंदर अक्षर कार्यशाळा
४ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंत्रालयातील सचिवालय जिमखाना तर्फे आयोजित केले होते. मंत्रालयात सुंदर अक्षरांचे धडे देणारे गुरुजी मी पहिल्यांदाच पाहिले…श्री अमितजी भोरकडे गुरुजी यांना ही संधी केवळ आपल्या आजवर केलेल्या सुंदर अक्षरांची केलेल्या सेवेचे एक प्रतिक मी मानतो. ही कार्यशाळा अगदी जवळून पाहण्याचे भाग्य अमितजी यांच्या मुळे मला मिळाले. आपण नेहमी मंत्रालयात फक्त आपल्या कोणत्यातरी कामासाठी जात असतो पंरतू यावेळी श्री अमितजी यांनाच मंत्रालयात सुंदर अक्षरांचे धडे देण्यासाठी निमंत्रण दिले होते. मंत्रालयातील संपूर्ण महाराष्ट्राची प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारे मंत्रालयातील अनेक उच्च पदस्थानी असणारे सचिव- उपसचिव, सहसचिव ,कक्ष अधिकारी व कर्मचारी यांना सुंदर अक्षरांचे धडे देण्याचे
भाग्य अमित गुरुजींना लाभले त्यांचा मी साक्षीदार झालो आणि वाटले की कोणताही प्राथमिक शिक्षक लहान नसतो, तर तो त्यांच्या कष्टाने, ज्ञानाने मोठा असतो यांचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे ..श्री अमितजी भोरकडे गुरुजी….! सरांनी मंत्रालयात सुंदर अक्षर कार्यशाळा घेणे हे माझ्या सारख्या असंख्या प्राथमिक शिक्षकांचाच गौरव वाटतो. कारण आजवर प्राथमिक शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन जरा वेगळाच आहे.
मुंबईत पाऊल ठेवल्यापासून मुंबई सोडण्यापर्यंत सेवा देणारे मंत्रालयातील अधिकारी हे दुर्मिळ असतात. कारण अधिकारी म्हटले ही थोडा बडेजाव असतो तो येथे मला दिसून आला नाही.
जेव्हा अमित सर यांच्या कार्यशाळेचे उदघाटन सुरु झाले तेव्हा सर्व अधिकारी यांनी सरांनी सरस्वती पूजन करण्याचा मान दिला. कोणत्याही कार्यक्रमाला पुढे स्टेजवर बसण्यासाठी प्रत्येकांची थडपड सुरु असते परंतू त्यावेळी मंत्रालयातील एक ही अधिकारी पुढे आले नाहीत. कारण आम्ही आमच्या गुरुचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहेत हे मंत्रालयीन अधिकारी यांच्याकडून उत्तर आले…एवढा मोठा सन्मान जि प च्या गुरुजींना मिळातो ही अभिमानाची आणि आजवर केलेल्या कामाची फार मोठी पावती आहे.
गुरु सबसे बडा होता है| यांचा अनुभव मला आला. सरांची कार्यशाळा सुरु असताना प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तोंडून ग्रेट,खुपच सुंदर,वा !!! अशा प्रकारचे शब्द प्रत्येकांच्या तोंडून पडत होते हे मी जवळून ऐकत होतो. गुरुजींना दिलेला अप्रत्यक्ष सन्मान मी अनुभवत होतो. अमित सरांची कामाप्रती नेहमी असणारी समर्पण भावना दिसून आली व प्रत्येक अक्षरातील बारकावे आपल्या अमोघ वाणीतून मी ऐकत होतो
अमित सरांची पुस्तके देण्याचं काम माझ्याकडे होते त्यावेळी प्रत्येक जण सरांचे पुस्तक घेवून सरांची पुस्तकावर स्वाक्षरी घेण्यासाठी जात होते. आजवर मंत्रालयात अधिकारी यांच्या सही साठी कित्येक दिवस जातात कित्येक हेलपाटे मारावे लागतात त्याच मंत्रालयात अमित सरांची स्वाक्षरी अक्षरप्रेमी अधिकारी घेत होते ही फार मोठी बाब होती हिच गुरुजीची ताकद आणि ज्ञानाचा आणि कलेचा सन्मान दिसून आला. याचबरोबर अक्षरप्रेमी श्री प्रमोदजी देठे यांनीही स्वनिर्मित लेखणी टूलचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले आणि सरांनी कमी वेळेत सर्वांची दाद मिळवली प्रमोद सरांचे ही कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
कार्यशाळेचे आयोजन करणारे उपसचिव मा.श्री.संजय इंगळे साहेब यांचे मनापूासून धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो की, साहेबांनी आमच्या सर्वांचीच राहण्याची,जेवणाची सोय खुपच जबरदस्त आणि अतिशय उत्कृष्टपणे केली होती. मंत्रालयाच्या बाहेर प्रवेश करण्यासाठी मुंग्या सारख्या लागलेल्या रांगा होत्या परंतू आम्हाला साहेंबानी स्पेशल चारचाकी वाहनाने थेट मंत्रालयात प्रवेश दिला ही आमच्या साठी खुपच मोठी आनंद देणारी व सन्मानाची बाब होती.
कार्यशाळा झाल्यावर मा. श्री इंगळे साहेब व अमितसर सह सर्व अक्षरप्रेमी यांच्याशी स्वताच्या केबिन मध्ये जवळपास १ ते २ तास सर्वविषयावर चर्चा करत बसलो होतो असे अधिकारी मी प्रथमच पाहात होतो. उपसचिव संजय इंगळे साहेब, अपर्णा जाधव मॅम, ज्ञानेश पाटमासे साहेब, तसेच प्रशांत साजनीकर साहेब, मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसाचिव कैलास बिलोनिकर साहेब, व्यकंटेश भट साहेब , गृह विभागाचे चेतन निकम साहेब , अक्षरमित्र माजी कस्टम ऑफीसर मदन पवार साहेब, प्रकाश गायकवाड, संजय पुंडकर, मुकेश नायक, नेव्ही ऑफीसर सचिन सावंत, महिती व जनसंपर्कचे सुशिम कांबळे , वीजमंडळाचे अभियंता ईश्वर भारती साहेब हे ही पास काढून उपस्थित राहिले.
हा अनुभव व ही कार्यशाळा सर्व शिक्षकांना नेहमीच प्रेरणा देणारी ठरेल असे मला वाटते !!
श्री अमित सरांचे मनापासून धन्यवाद कारण या कार्यशाळेचा एक भाग होण्याची संधी त्यांनी दिली आयुष्यातील एक खूप मोठे आनंदी क्षण वेचता आले. सरांना पुढील कामासाठी खुपखुप शुभेच्छा!! आणि सलाम !
विजागत ज्ञानेश्वर तंत्रस्नेही शिक्षक