School Education and Sports Department
pavitra – teacher recruitment 2022
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in
TAIT ऑनलाइन अर्ज कसा करावा
उमेदवारांनी फक्त MSCE च्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा, अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.
नोंदणीपूर्वी लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे:
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी:
(i) पुढील गोष्टी स्कॅन करून तयार ठेवाव्यात:
- फोटोग्राफ (4.5cm × 3.5cm)
- स्वाक्षरी (काळ्या शाईने)
- डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळी किंवा निळी शाई वापरून)
- स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने)
(घोषणाचा मजकूर खाली दिला आहे)
सर्व स्कॅन केलेली कागदपत्रे जाहिरातीत दिलेल्या परिशिष्ट III नुसार असणे आवश्यक आहे.
(ii) स्वाक्षरी मोठ्या अक्षरात (CAPITAL LETTERS) चालणार नाही.
(iii) डाव्या अंगठ्याचा ठसा व्यवस्थित स्कॅन केलेला असावा, धूसर किंवा अस्पष्ट नसावा.
(जर उमेदवाराकडे डावा अंगठा नसेल, तर उजवा अंगठा वापरावा.)
(iv) हस्तलिखित घोषणेचा मजकूर पुढीलप्रमाणे असावा:
“I, (उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid and subject to satisfactory document verification by MSCE. I will present the supporting documents as and when required. If at any stage of the selection process it is found that I do not satisfy any of the conditions for the post, my candidature is liable to be cancelled and no further queries will be entertained by MSCE in this regard and MSCE shall not be liable in any way whatsoever.”
(v) वरील हस्तलिखित घोषणा उमेदवाराने स्वतः इंग्रजीतच लिहिलेली असावी.
(जर उमेदवार दृष्टिहीन असेल तर तो मजकूर टाईप करून खाली डाव्या हाताचा अंगठा उमटवून अपलोड करू शकतो.)
(vi) ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/तपशील तयार ठेवावेत.
(vii) वैध व्यक्तिगत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा, जो संपूर्ण भरती प्रक्रियेपर्यंत सक्रिय ठेवावा.
(MSCE कडून कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी सूचना ई-मेल / एसएमएस द्वारे पाठवली जाईल.)
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:
A. अर्ज नोंदणी:
- MSCE च्या वेबसाइटला भेट द्या आणि “APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक करा.
- “Click here for New Registration” निवडा आणि नाव, संपर्क तपशील व ई-मेल आयडी भरा.
- प्रणालीद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक व पासवर्ड जनरेट केला जाईल. तो नोंदवून ठेवा.
- जर उमेदवाराने अर्ज पूर्ण भरू शकला नाही तर “SAVE AND NEXT” वापरून माहिती जतन करू शकतो.
- अंतिम नोंदणीपूर्वी सगळी माहिती काळजीपूर्वक तपासूनच अर्ज सादर करावा.
- उमेदवाराचे/त्यांच्या वडीलांचे/पतीचे नाव प्रमाणपत्र/मार्कशीटप्रमाणेच लिहावे.
- तपशील सत्यापित करा व “Validate your details” व “Save & Next” वर क्लिक करा.
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करा (मार्गदर्शक तत्त्वानुसार).
- सर्व माहिती पूर्ण करून ‘COMPLETE REGISTRATION’ वर क्लिक करा.
- नंतर ‘Payment’ टॅबवर जाऊन शुल्क भरा.
- ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
B. शुल्क भरणे:
- अर्ज शुल्क भरल्यानंतर कोणतीही परतफेड केली जाणार नाही.
- शुल्क फक्त अधिसूचनेत दिलेल्या पद्धतीनेच भरावे.
- डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/इतर डिजिटल माध्यमांनी शुल्क भरता येईल.
- यशस्वी व्यवहारानंतर ‘ई-Receipt’ जनरेट होईल.
- व्यवहार अपयशी झाल्यास, पुन्हा लॉगिन करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी.
C. दस्तऐवज स्कॅन व अपलोड मार्गदर्शक सूचना:
फोटो:
- अलीकडील पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र घ्यावे.
- पांढऱ्या/हलक्या रंगाच्या पार्श्वभूमीवर घ्यावे.
- फोटो 20kb ते 50kb मध्ये असावा.
फोटो कॅप्चर:
- वेबकॅम किंवा मोबाईल फोन वापरून थेट फोटो क्लिक करून अपलोड करता येईल.
स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणा:
- स्वाक्षरी: पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने (10kb-20kb).
- डाव्या अंगठ्याचा ठसा: काळ्या/निळ्या शाईने (20kb-50kb).
- हस्तलिखित घोषणा: काळ्या शाईने (50kb-100kb).
दस्तऐवज अपलोड करताना लक्षात ठेवावयाचे मुद्दे:
- सर्व प्रतिमा JPG/JPEG फॉरमॅटमध्ये असाव्यात.
- प्रतिमा स्पष्ट असाव्यात, अस्पष्ट असल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा योग्य ठिकाणी अपलोड केलेली असली पाहिजे
वरील पोस्ट मध्ये कोणताही बदल होवू शकते त्यासाठी शासनाची अधिकृत वेबसाईटला भेट दया. Office Websites MSCE Pune