Exclamation Mark (!): आश्चर्य, आनंद किंवा भीती व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. (उदा. Hurray!, How beautiful!)
Question Mark (?): जेव्हा वाक्यात प्रश्न विचारला जातो, तेव्हा शेवटी हे चिन्ह येते. विनंतीवजा प्रश्न असेल तरीही प्रश्नचिन्हच येते.
Apostrophe (‘): मालकी हक्क दर्शवण्यासाठी (Rohan’s bag) किंवा शब्दांचे संक्षिप्त रूप करण्यासाठी (It’s, Don’t) वापरला जातो.
Comma (,): यादीतील शब्द वेगळे करण्यासाठी किंवा वाक्यात थोडा वेळ थांबण्यासाठी वापरला जातो.
Quotation Marks (‘ ‘): एखाद्याच्या तोंडाचे शब्द जसेच्या तसे लिहिताना वापरतात.
English: Punctuation Marks
१५ कठीण प्रश्नांची सराव चाचणी.
“विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरणामध्ये विरामचिन्हे (Punctuation Marks) योग्य ठिकाणी वापरणे अत्यंत महत्त्वाचे असते. चुकीच्या विरामचिन्हामुळे वाक्याचा अर्थ बदलू शकतो. स्कॉलरशिप परीक्षेसाठी हे घटक खूप आव्हानात्मक असतात. आजच्या या विशेष चाचणीत आपण ‘Apostrophe’, ‘Comma’, ‘Exclamation Mark’ यांसारख्या चिन्हांचा सराव करणार आहोत. तुमचे उत्तर चुकल्यास अचूक उत्तर तुम्हाला लगेच हिरव्या रंगात दिसेल. ज्ञानेश्वर विजागत सरांनी तयार केलेली ही १५ प्रश्नांची टेस्ट नक्की सोडवा!
